हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत.
Picture Credit: Pinterest
या ऋतूत, हार्ट अटॅकचा धोका कशाप्रकारे वाढतो? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
थंड हवेमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात यामुळे रक्तदाब अचानक वाढतो आणि हृदयावर ताण येतो.
या थंड वातावरणात आपल्या शरीराचे तापमान नॉर्मल राहावे यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते.
हिवाळ्यात हवा कोरडी आणि प्रदूषित असते, त्यामुळे शरीराला कमी ऑक्सिजन मिळते.
पहाटेच्या वेळी थंडीत रक्तदाब आणि हार्ट स्ट्रेस वाढतो. यामुळे हृदयविकाराच्या घटना वाढतात.
थंडीत लोक चालणे, धावणे किंवा हलचाल टाळतात, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता वाढते.