Published March 13, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
होळी हा सण सत्य आणि न्यायाच्या विजयाचे प्रतीक आहे. हिरण्यकशिपु आणि भक्त प्रल्हाद यांच्या कथेमुळे हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो.
धुलिवंदनाला सर्वजण रंग खेळतात, त्यामुळे हा सण आनंद, मस्ती आणि उत्साहाने भरलेला असतो.
होळीच्या निमित्ताने समाजातील सर्व स्तरांतील लोक एकत्र येतात आणि आपले नाते संबंध मजबूत करतात.
जुने भांडण, वाद विसरून नवीन नाती जपण्याची ही संधी असते. "बुरा न मानो, होली है" हा विचार लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करतो.
होळीचा सण ऋतू परिवर्तनाशी संबंधित आहे. हिवाळ्यानंतर येणाऱ्या वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
होळीच्या दिवशी आपली आवडती पुरणपोळी आणि आमटी बनवली जाते.
होळी हा सण जुन्या गोष्टी मागे टाकून नवीन सुरुवात करण्याचा संदेश देतो.
ढोल, ताशे, गाणी आणि पारंपरिक नृत्य यामुळे होळीचा आनंद द्विगुणित होतो.