जगात एक असा देश आहे जिथे मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी लग्नच करण्यात येत नाही, नक्की काय आहे कारण
वास्तविक हा देश ग्रीस असून ही पूर्वपरंपरा आहे आणि जुन्या गोष्टी आणि धार्मिक आधारावर हे जोडले गेले आहे
ग्रीसमध्ये मंगळवार अशुभ मानला जात असून 1453 मध्ये कॉन्स्टँन्टिनोपलवर हल्ला होऊन बिन्जामन राज्य लुप्त पावले होते
मंगळवारी लग्न केल्याने या देशातील लग्न जास्त काळ टिकत नाहीत अशी येथे धारणा आहे
ईसाई मान्यतेनुसार, शुक्रवारी ईसा मसीहला फाशी देण्यात आल्याने प्रायश्चित्त म्हणून हा दिवस मानला जातो, यामुळे लग्न वा शुभकार्य करण्यात येत नाही
ग्रीसमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अधिक असून ग्रामीण लोक लग्नाच्या तारखेआधी धर्म विशेषत्ज्ज्ञ आणि मोठ्या माणसांचा सल्ला घेतात
21 व्या शतकात हा बदल झाला असला तरीही ग्रामीण लोक याच विचाराने चालतात. मात्र शहरी लोक दुर्लक्ष करतात
शनिवार आणि रविवार ग्रीसमध्ये शुभ दिन मानला जात असून उत्सव आणि लग्न साजरे होते
भारतात मुहूर्त पाहिला जातो तर ग्रीसमध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक दिवस पाहिले जातात
ग्रीसमधील हे परंपरा केवळ अंधविश्वास नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते