Published Sept 23, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
श्राद्धात पहिली आहुती अग्नीला का?
हिंदू धर्मात 16 दिवसांच्या या पितृपक्षाला खूपच महत्त्व असून सर्वात पहिले अग्नीला भोजन अर्पण करण्यात येते
पितरांचे श्राद्ध करताना अग्निला सर्वप्रथम अन्न अर्पण करण्याचे कारण ज्योतिषी पंडित अरविंद त्रिपाठी यांनी सांगितले आहे
पौराणिक कथेनुसार राजा निमीने अत्रि मुनींच्या सांग्यावरून सर्वप्रथम श्राद्ध करणे सुरू केले आणि नंतर पितृपक्षात श्राद्ध होऊ लागले
.
सतत भोजन ग्रहण केल्याने देव आणि पितर पूर्ण तृप्त झाले होते, त्यामुळे अन्न न पचून अजीर्ण होण्याची समस्या निर्माण झाली
.
ही समस्या घेऊन पितृ ब्रम्हदेवाकडे गेले ज्यावर त्यांनी सुटकेसाठी एक सुपाय सुचवला
यापुढे अग्निदेव पितरांसह भोजन करतील असे ब्रम्हदेवांनी सांगितले, ज्यामुळे अजीर्ण होण्यापासून मुक्ती मिळाली
ब्रम्हदेवाच्या या उपायानंतर पितरांचे अजीर्ण नीट झाले आणि त्यानंतर सर्वात पहिले अग्निला भोजन देण्यात येऊ लागले
सर्वात प्रथम अग्नीला अन्न अर्पण केल्यानंतर पितर आणि अग्नी एकत्र जेवतात असे म्हटले जाते, या परंपरेने पिढ्यांचे शुभ होते
अग्निला अन्नदान प्रथम केल्याने आपल्या पूर्वजांकडे लवकर पोहचते आणि यामुळे वंशाचा आशिर्वाद मिळतो
ही माहिती ज्योतिषशास्त्राप्रमाणे असून आम्ही कोणताही दावा करत नाही