भारतीय ऑटो बाजारात SUV वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Picture Credit: Pinterest
चला यामागील कारणांबद्दल जाणून घेऊयात.
भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेता खड्डे, स्पीड ब्रेकर आणि खराब रस्त्यांवर SUV सहज चालते.
SUV चे उंच आणि रुंद डिझाइन रस्त्यावर आकर्षक आणि प्रभावी दिसते, त्यामुळे अनेक ग्राहकांना ती अधिक पसंत पडते.
मोठी केबिन, अधिक लेगरूम आणि बूट स्पेस कुटुंबासोबत प्रवासासाठी सोयीची ठरते.
आधुनिक SUV मध्ये टचस्क्रीन, 360° कॅमेरा, ADAS, क्रूझ कंट्रोल यासारखे प्रगत फीचर्स उपलब्ध असतात.
पेट्रोल, डिझेल, CNG तसेच इलेक्ट्रिक SUV चे पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांना निवडीची संधी मिळते.
SUV ची मागणी जास्त असल्याने तिची Resale Value इतर सेगमेंटपेक्षा तुलनेने चांगली राहते.