Published November 19, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
दरवर्षी 19 नोव्हेंबरला जगातील 30 पेक्षा अधिक देशात जागतिक पुरुष दिन साजरा केला जातो.
पुरुषांचे समाज आणि कुटुंबातील स्थान, योगदान, आणि महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
या निमित्ताने का होईना, पुरुषांच्या समस्या, आरोग्याबाबत जनजागृती तसेच चर्चा होते.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्याची मागणी 1923 साली करण्यात आली. मात्र हा दिवस 1999 साली साजरा करण्यात आला.
यानंतर काही वर्षातच 19 नोव्हेंबर ही तारीख आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून लोकप्रिय झाली.
भारतात 19 नोव्हेंबर 2007 ला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला.
यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम ही 'पॉझिटिव्ह मेल रोल मॉडेल्स’ अशी आहे.
समाजासाठी सकारात्मक योगदान देणाऱ्या पुरुषांचा सन्मान करणे हा या थीमचा मुख्य उद्देश आहे.