अष्टमी-नवमीला कन्या पूजन का करतात?

Life style

09 october 2026

Author:  नुपूर भगत

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, लहान मुलींमध्ये देवी दुर्गेचे रूप पाहिले जाते. त्यामुळे कन्या पूजन करून देवीप्रती श्रद्धा आणि भक्ती व्यक्त केली जाते.

देवीचे रूप मानले जाते

Picture Credit: Pinterest

नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच महाष्टमीला किंवा नवव्या दिवशी महानवमीला कन्या पूजन केले जाते. अनेक कुटुंबांमध्ये ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते.

 अष्टमी आणि नवमीला महत्त्व

Picture Credit: Pinterest

काही परंपरांमध्ये नऊ लहान मुलींना देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक मानून त्यांचे पूजन केले जाते.

 नऊ कन्यांचे पूजन

Picture Credit: Pinterest

कन्या पूजनाच्या वेळी मुलींना घरी आमंत्रित करून त्यांचे पाय धुतले जातात. त्यानंतर त्यांना कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करून आदर व्यक्त केला जातो.

 कन्यांचे पाय धुण्याची परंपरा

Picture Credit: Pinterest

या दिवशी मुलींना पुरी, काळ्या हरभऱ्याची उसळ आणि हलवा किंवा खीर असे पारंपरिक पदार्थ खाऊ घातले जातात. हा प्रसाद प्रेमाने देणे शुभ मानले जाते.

 भोजनाचा नैवेद्य

Picture Credit: Pinterest

कन्या पूजनानंतर मुलींना फळे, कपडे किंवा दक्षिणा दिली जाते. यामागे मुलींबद्दल प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असते.

 भेटवस्तू देण्याची प्रथा

Picture Credit: Pinterest

कन्या पूजन हे केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित नसून ,मुलींना समान संधी, सन्मान आणि प्रेम देणे हाच या परंपरेचा महत्त्वाचा सामाजिक अर्थ आहे.

स्त्रीशक्तीचा सन्मान

Picture Credit: Pinterest