मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
Picture Credit: Pinterest
मुंबईत अनेक मंडळाचे बाप्पा लोकप्रिय आहे.
यातही सर्वात जास्त लोकप्रिय लालबागचा राजा आहे.
लालबागच्या राजाला "नवसाचा गणपती" म्हटले जाते, कारण येथे केलेली मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे.
प्रत्येक वर्षीचे भव्य मंडप, सजावट आणि मांडणी भक्तांना आकर्षित करते आणि दैवी अनुभूती देते.
अनेक सेलिब्रिटी, नेते, उद्योगपती दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेतात, त्यामुळे जनसामान्यांची श्रद्धा अधिक दृढ होते.
लाखो भक्त 10-12 तास रांगेत उभे राहूनही दर्शन घेतात, यावरून भक्तिभावाची तीव्रता दिसून येते.
लालबागचा राजा फक्त धार्मिक नसून समाजकार्य, रुग्णसेवा, मदतकार्य अशा उपक्रमांशी जोडलेला आहे.