Published Sept 10, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
रात्री ब्रश करणे का आहे गरजेचे?
रात्री झोपण्यापूर्वी ब्रशने दात घासून झोपावे हे शिकवलं जातं. पण असं केल्याने नक्की काय परिणाम होतात?
दातांचा पिवळेपणा आणि तोंडाचे आजार होऊ नयेत यापासून तुम्ही सुटका मिळवू शकता
रात्री तुम्ही ब्रश न करता झोपण्याने तोंडात इन्फेक्शन होऊ शकते कारण जेवल्यानंतर दातात बॅक्टेरिया जमा होतात
.
रात्री ब्रश न केल्यास तोंडातून दुर्गंधी येते आणि ती अधिकाधिक वाढते, कारण लाळेत काही बॅक्टेरिया मिक्स होतात
.
ब्रश न केल्याने हिरड्यांमधून दात कमकुवत होतात आणि वेळेआधीच पडायला सुरूवात होते
ब्रश न केल्याने रात्रभर दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये अन्न अडकून पडते आणि त्यामुळे हिरड्या कमकुवत होतात
याशिवाय रात्री ब्रश न केल्याने निमोनिया, डिमेन्शिया आणि श्वासासंबंधित आजार होतात
रात्री ब्रश करणे अजिबात विसरू नका आणि दातांची काळजी घ्या