लग्नामध्ये अनेक परंपरा आणि विधी आहेत. यातीलच एक हळद हा विधी आहे.
हळद हा असा विधी आहे ज्याच्याशिवाय आपण लग्नाची कल्पना देखील करू शकत नाही. हा विधी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
मात्र काही लोकांना कल्पना नसते की हळद करण्यामागे कारण काय आहेत ते जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रहाला मजबूत करण्यासाठी हळदीचा विधी केला जातो.
असे मानले जाते की, गुरू ग्रहाला हळद आणि त्याचा आवडता रंग पिवळा आहे. यामुळे वधू वराच्या पूर्ण शरीराला हळद लावली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार विशेषतः विवाहात, गुरु ग्रहाचे बलवान असणे खूप महत्त्वाचे आहे.
असे मानले जाते की, जेव्हा हा ग्रह मजबूत स्थितीत असतो, तेव्हाच व्यक्ती लग्न करते.
असेही मानले जाते की जर हा ग्रह थोडासाही कमकुवत असेल तर लग्नात आलेले पाहुणे परत येऊ शकतात, म्हणून हा विधी केला जातो.
पण लक्षात ठेवा की हळदीचा सोहळा होळीसारखा साजरा करू नये. कारण ही एक अतिशय पवित्र गोष्ट आहे आणि ती मर्यादेतच केली पाहिजे.