Published Jan 20, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
बिबट्या हा धोकादायक प्राण्यांपैकी एक मानला जातो.
गेल्या काही वर्षांत भारतात बिबट्यांकडून मानवांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली.
तुम्ही अशा अनेक घटना ऐकल्या असतील ज्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात माणसं जखमी झाली.
पण बिबट्या माणसांवर का हल्ला करतो हे तुम्हाला माहीत आहे का?
बिबट्या मानवी शरीराच्या कोणत्या भागावर प्रथम हल्ला करतो?
वनविभागाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं की, बिबट्या माणसांवर लवकर हल्ला करत नाही.
धोक्याची जाणीव झाल्यानंतरच बिबट्या हल्ल्याची तयारी करतो.
वास्तविक, बिबट्या भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीच्या भागात जातो.
लोकवस्तीतील मानवांना पाहून बिबट्या घाबरतो, त्यानंतर तो हल्ला करतो.
मानव किंवा प्राण्यावर हल्ला करताना बिबट्या सर्वात आधी मानेवर हल्ला करतो.
बिबट्याने कोणत्याही व्यक्तीचा गळा घट्ट धरला तर त्या व्यक्तीला तेथून निसटणे कठीण मानले जाते.
हल्ला टाळण्यासाठी बिबट्या समोर आल्यानंतर घाबरू नये.
बिबट्याच्या नजरेला नजर मिळवू नये.
बिबट्या समोर येताच जोराजोरत ओरडण्यास सुरुवात करावी.