औषधी गोळ्या रंगीत असण्यामागचं कारण काय?

Written By: Harshada Jadhav

Source: Pinterest

प्रत्येक गोळी आणि कॅप्सूलचा एक विशिष्ट रंग असतो.

रंग 

वेगवेगळ्या रंगांच्या गोळ्या रुग्णाला त्यांची औषध ओळखण्यास मदत करतात.

औषध 

फार्मासिस्ट देखील औषधांची लवकर ओळख पटवण्यासाठी त्यांच्या रंगांवर अवलंबून असतात.

फार्मासिस्ट 

बऱ्याचदा कंपन्या औषधांचा रंग अशा प्रकारे निवडतात की त्याचा रुग्णाच्या मनावरही परिणाम होतो.

रुग्ण

कंपन्या असे रंग निवडतात जे सूर्यप्रकाशापासून औषधाचे संरक्षण करण्यास मदत करतात.

सूर्यप्रकाश

रंगीत लेप केवळ औषध आकर्षकच बनवत नाही तर त्याची कडू चव देखील लपवते.

चव 

औषधाचा रंग रुग्णाची मानसिक स्थिती, औषधाची ओळख आणि त्याची सुरक्षितता लक्षात घेऊन ठरवतात.

औषध

कधीकधी डॉक्टर मानसिक परिणामांसाठी विशिष्ट रंगांची औषधे देखील लिहून देतात.

रंग