पहिल्याच पावसात मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
Picture Credit: Pexels
पण प्रत्येक पावसात मुंबईत पाणी का साचते? चला याबद्दल जाणून घेऊया.
मुंबईतील ड्रेनेज सिस्टीम जुनी असून, अनेक भागांमध्ये पाणी योग्य वेगाने वाहून जाण्याची व्यवस्था नाही.
झपाट्याने वाढणाऱ्या झोपडपट्ट्या व बेकायदेशीर बांधकामांमुळे देखील पाणी साचत आहे
नाल्यांमध्ये प्लास्टिक आणि कचरा टाकल्याने ते तुंबतात व पावसाचे पाणी वाहून जात नाही.
अनेक ठिकाणी नाले अरुंद किंवा अपुरे आहेत, जे मुसळधार पावसाचा भार सहन करू शकत नाहीत.
हरित क्षेत्रे आणि मोकळ्या जमिनी कमी झाल्यामुळे पावसाचे पाणी मुरण्याऐवजी रस्त्यावर साचते.