Written By: Mayur Navle
Source: Yandex
आज संपूर्ण जगभरात जागतिक मातृदिन साजरा होत आहे. याच निमित्ताने आज आपण आईचं प्रेम विशेष का आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.
आई कोणत्याही अटीशिवाय, पूर्णपणे नि:स्वार्थ प्रेम करते.
आपल्या जन्माआधीपासूनच आईचं प्रेम सुरू झालेलं असतं.
इतरजण दूर जातात, पण आई दुःखातही आपल्याला घट्ट धरून ठेवते.
आरोग्य, खाणं-पिणं, अभ्यास, भावनिक अवस्था… आपल्या मुलाचे आई सर्वकाही पाहते.
आपली चूक असली तरी ती समजून घेते आणि योग्य मार्ग दाखवते.
दिवसरात्र कष्ट करूनसुद्धा ती आपल्यासाठी सदैव उपलब्ध राहते.
संकटात इतर जण माघार घेतील, पण आई कायम आपल्याबरोबर उभी राहते.