जगातील कोट्यवधी लोकं आहेत जे दारूचे सेवन करत असतात.
Img Source: Pexels
मात्र, दारू वाईट असून देखील कित्येक जणं ती रोज पित असतात. ते असे का करतात?
मित्रमंडळी, सहकारी किंवा पार्टीमध्ये दारूला ‘नाही’ म्हणायला संकोच वाटतो आणि नकळत सुरुवात होते.
अनेकांना दारू पिणे म्हणजे रिलॅक्स होणे, मजा करणे आणि एखादा क्षण सेलिब्रेट करणे असे वाटते.
कामाचा, वैयक्तिक आयुष्याचा ताण कमी करण्यासाठी काही लोकं दारूचा आधार घेतात.
सिनेमे, वेब सिरीज आणि जाहिरातींमध्ये दारूला ‘स्टाइलिश’ दाखवल्याने ती ग्लॅमरस वाटते.
काहीजण वैयक्तिक दुःख, प्रेमभंग किंवा मानसिक वेदना विसरण्यासाठी दारू पितात.