Written By: Mayur Navle
Source: Pexels
आपण जसजसे मोठे होत जातो. तसतसे आपल्या आयुष्यात नवीन मित्र मैत्रिणी येतात. पण शाळेतल्या मित्रांची बातच काही और असते.
शाळेतली मैत्री खास असण्याचे कारण म्हणजे यात कोणत्याही अपेक्षेशिवाय आणि स्वार्थाशिवाय असणारी मैत्री असते.
एकाच वर्गात, एकाच वेळेस शिकताना एकमेकांची स्वभाव आणि मैत्री अनुभवता येते, जे आयुष्यभर लक्षात राहतं.
शाळेतील मित्रांशी कोणतीही गोष्ट लपवावी लागत नाही. ते आपोआप समजते.
मधल्या सुट्टीत केलेली मज्जा आणि मित्रांना डब्बा शेअर करताना झालेल्या गप्पा अविस्मरणीय ठरतात.
शाळा संपली तरी मैत्रीचे किस्से, फोटो, गाणी, वहीतले messages हे सगळं मनात घर करून राहतं.
कितीही वर्षं झाली तरी शाळेचा मित्र भेटला की मन पुन्हा त्या वयात जाते.