Published March 26, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
शाळेतील दिवस तणावमुक्त आणि आनंददायी असतात. जबाबदाऱ्या कमी असल्यामुळे आपल्याला जीवन खूप हलकं वाटतं.
याच काळात काही आयुष्यभर टिकणाऱ्या मैत्री जुळतात. शाळेतील मित्र हे केवळ मित्र नाही, तर कुटुंब होतात.
वर्गात शिक्षकांची मस्करी करणे, मधल्या सुट्टीत धमाल करणे, खोडकर मित्रांचे किस्से या आठवणी कायम मनात राहतात.
शाळेतील मैदानी खेळ, सांस्कृतिक स्पर्धा आणि वार्षिक स्नेहसंमेलनात केलेली मज्जा पुन्हा पुन्हा आठवते.
शिक्षक हे केवळ विषय शिकवणारे नसतात, तर जीवनाचे मूल्यही शिकवतात. त्यांचे धडे आणि शिकवण आयुष्यभर उपयोगी पडतात.
शाळेतील पहिल्या क्रशच्या आठवणी खूप गोडसर आणि निरागस असतात, ज्या मनात घर करून राहतात.
शाळा आपल्याला वेळेचे महत्त्व, संयम आणि शिस्त शिकवते, जे भविष्यात उपयोगी पडते.
नवीन इयत्तेत जाण्याचा आनंद आणि त्यासोबत नवीन शिक्षक, मित्र यांची ओळख यामुळे प्रत्येक वर्ष लक्षात राहणारा ठरतो.