आपल्या पुर्वाजांना रुढी परंपराचं मोठं महत्त्व होतं. आजही गावच्या ठिकाणी पाहिलं तर घराचा उंबरठा हा लाकडी असतो.
Picture Credit: Pinterest
लाकडी उंबरा हा घरात जाणाऱ्या मुंग्या, झुरळं, साप यांसारख्या कीटकांना अडथळा निर्माण करतो.
लाकूड हे विद्युत रोधक आहे. त्यामुळे विद्युत प्रवाहापासून हे घरातल्या लोकांना सुरक्षित ठेवते.
लाकडी उंबरा घराच्या आत बाहेर होणाऱ्या आवाजाची तीव्रता कमी करतो. त्यामुळे घरात शांतता राखली जाते.
वास्तूनुसार दाराच्या उंबऱ्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
लाकडी उंबरा घराच्या आतील आणि बाहेरील वातावरणातील आर्द्रता नियंत्रित करण्यात मदत करतो.