www.navarashtra.com

Published  Jan 12,  2025

By  Trupti Gaikwad 

सुगड पुजन म्हणजे काय? का करतात संक्रांतीला सुगडाची पूजा ?

Pic Credit- pinterest

तिळगुळ घ्या आणि गोड बोला अशा शुभेच्छा संक्रांतीच्या दिवशी दिल्या जातात.

संक्रांत

संक्रांतीला सुगड पूजन आवर्जून केलं जातं. हे सुगड पूजन संक्रांतीला करण्यामागे काही शास्त्रीय कारणं आहे.

 सुगड पूजन

 "किस्सों की दुनिया" या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ओमकार सावंत यांनी सुगड पूजनाचं शास्त्रीय कारण सांगितलं आहे.

शास्त्रीय कारण 

सुघट म्हणजे शेतमालाने भरलेला घट. कालांतराने सुघट अपभ्रंश सुगड असा झाला.

सुगड 

शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरुन मकर संक्रांतीला त्याचं पूजन करतात.

पूजन

आपल्या जे काही मिळालंय ते निसर्गामुळे मिळालंय .त्याचे आभार मानण्यासाठी सुगड पूजन केलं जातं.

सुगड पूजन 

हरभरा, ऊस, शेंगदाणेे, बोरं, गव्हाच्या लोंब्या, तिळगुळ, हळद आणि कुंकू यांचा सुगडात समावेश असतो.

हळद आणि कुंकू 

.

यात निसर्गकृुपेने मिळालेल्या धान्याची पुजा केली जाते. काही जण पाच तर काही जण दोन सुगड पूजतात.

निसर्ग कृपा

.