आपल्या त्वचेला उन्ह्याच्या किरणांपासून सनस्क्रीनचा वापर होत असतो.
Picture Credit: pinterest
मात्र, अनेकांची अशी समजूत असते की फक्त उन्हाळ्यातच सनस्क्रीन लावावे.
मात्र, ही चुकीची समजूत आहे. तुम्ही प्रत्येक ऋतूत सनस्क्रीन वापरली पाहिजे.
सूर्यप्रकाशामुळे त्वचेत मेलानिनचं उत्पादन वाढतं, ज्यामुळे त्वचा काळी पडते. नियमित सनस्क्रीन यावर नियंत्रण ठेवते.
पावसाळा, हिवाळा किंवा ढगाळ वातावरण असलं तरी UVA किरणं त्वचेपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे वर्षभर संरक्षण आवश्यक आहे.
नियमितपणे सनस्क्रीन वापरणे त्वचेच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी करते.
सनस्पॉट्स किंवा इतर डाग रोखण्यासाठी सनस्क्रीन उपयुक्त ठरते.