अनेकदा आपण चित्रपट पाहता असतो. मात्र, नाटक पाहाण्याचा योग कमीच असतो.
Picture Credit: Pexels and Pinterest
अशातच आज आपण जाणून घेऊयात की चित्रपटापेक्षा नाटक पाहणं छान का असते?
नाटकात कलाकार थेट प्रेक्षकांसमोर सादरीकरण करतात, त्यामुळे तो क्षण वेगळाच असतो.
नाटकात "कट" नसतो, त्यामुळे कलाकारांची तयारी, शिस्त आणि नैसर्गिक अभिनय अधिक प्रभावी ठरतात.
प्रेक्षकांच्या टाळ्यांचा, हसण्याचा किंवा शांततेचा थेट अनुभव कलाकार घेतात.
मर्यादित साधनसामग्री असतानाही लाईटिंग, संगीत, पार्श्वभूमी आणि नेपथ्याचा वापर अत्यंत कल्पकतेने केला जातो.
तेच नाटक पुन्हा पाहिलं तरी कलाकारांची उर्जा आणि सादरीकरणात नेहमीच काहीतरी नवीन जाणवतं.
अनेक नाटकं सामाजिक, राजकीय किंवा भावनिक मुद्द्यांवर भाष्य करत असतात, जे अधिक खोलवर भिडतात.