हिंदू धर्मामध्ये माघ महिन्याचे विशेष महत्त्व आहे. हा महिना दान हे पुण्यपूर्ण आणि पवित्र मानले जाते.
माघ महिन्यात भगवान विष्णूच्या वासुदेव रूपाची पूजा केली जाते. तसेच उगवत्या सूर्याला प्रार्थना करणे
यावेळी काही गोष्टी खावू नये. असे म्हटले जाते की, माघ महिन्यात मुळा खावू नये.
धार्मिक श्रद्धेनुसार, माघ महिन्यात मुळा खाणे मद्य म्हणजे दारुच्या समान मानले गेले आहे
शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार या पवित्र महिन्यात जो व्यक्ती मुळा खातो त्या व्यक्तीला उपासनेचे पूर्ण फळ मिळत नाही
माघचा महिना आत्मशुद्ध आणि भगवान विष्णूची प्रार्थना करण्यासाठी मानला जातो त्यामुळे सात्विक अन्नावर भर दिला जातो
मुळा सध्या तामसिक श्रेणीत ठेवला जातो, जो एकाग्रतेमध्ये व्यत्यय आणू शकतो.
ब्रम्हवैव्रत पुराणात खाण्यापिण्याविषयी नियम सांगण्यात आलेले आहे. याव्यक्तिरिक्य माघ महिन्यात मुळा खाल्ल्याने माणसाचे पुण्य कमी होते आणि पापे वाढतात.
एकादशी आणि प्रतिपदा तिथीच्या दिवशी मुळा खावू नये. असे मानले जाते की, यावेळी मुळाचे सेवन केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते.