मैदा जास्त प्रमाणात खाणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. मैद्याच्या प्रक्रियेमध्ये गव्हातील कोंडा आणि पोषक भाग काढून टाकला जातो. यामुळे अतिरिक्त मैद्याचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
Picture Credit: Pinterest
मैदा पचायला जड असतो आणि त्यात फायबर नसल्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
मैद्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ वारंवार खाल्ल्यास लठ्ठपणा वाढू शकतो.
Picture Credit: Pinterest
मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
Picture Credit: Pinterest
अतिरिक्त मैद्याचे सेवन शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढवते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
मैदा पांढरा शुभ्र करण्यासाठी ब्लीचिंग प्रक्रिया केली जाते. तसेच यामध्ये पोषक घटक नसल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
Picture Credit: Pinterest
मैद्यामध्ये आम्लधर्मीय गुणधर्म असतात, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात