Mahindra SUV Price Hike 2026: पुन्हा महागणार SUV? जाणून घ्या कारण

Automobile

29 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

कंपनी पुन्हा किंमत वाढवण्याच्या विचारात; ग्राहकांच्या खिशावर किती परिणाम?

Mahindra SUV पुन्हा महागणार?

Picture Credit:mahindra

Mahindra आपल्या SUV पोर्टफोलिओच्या किमती पुन्हा वाढवण्याचा विचार करत आहे. मात्र, अंतिम निर्णय आणि वाढीची रक्कम अद्याप जाहीर झालेली नाही.

पुन्हा Price Hikeची शक्यता

Picture Credit:mahindra

यामागे Commodity Costs वाढणे हे प्रमुख कारण आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चाचा दबाव कमी करण्यासाठी किंमत वाढवण्याचा पर्याय कंपनीसमोर आहे.

नेमकं कारण काय?

Picture Credit:mahindra

Mahindra ने 10 जुलै 2026 पासून SUVच्या किमती सरासरी 2.7% वाढवल्या होत्या. आता पुन्हा किंमत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याआधीही झाली होती वाढ

Picture Credit:mahindra

सध्या कंपनीने कोणते मॉडेल किंवा कोणते variants किती महागतील, याची अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे Thar, Scorpio-N, XUV 3XO किंवा इतर SUVसाठी निश्चित वाढ सांगणे घाईचे ठरेल.

कोणत्या SUV महागणार?

Picture Credit:mahindra

किंमत वाढल्यास SUVची Ex-showroom Price वाढेल आणि त्याचा परिणाम On-road Price वरही होऊ शकतो. त्यामुळे Registration, Insurance आणि Financingचा एकूण खर्चही वाढण्याची शक्यता असते.

ग्राहकांच्या खिशावर परिणाम?

Picture Credit:mahindra

गाडीची किंमत वाढल्यास समान Down Payment ठेवताना Loan Amount वाढू शकतो. परिणामी EMI किंवा कर्जाचा एकूण परतफेडीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.

EMIवरही परिणाम होऊ शकतो

Picture Credit:mahindra

Mahindra SUV खरेदीचा प्लॅन असेल तर सध्याची किंमत, Dealer Offer आणि Festive Benefits तपासून घ्या. मात्र, फक्त संभाव्य Price Hikeच्या भीतीने घाईने Booking करण्यापूर्वी अधिकृत किंमत आणि ऑफरची खात्री करणे महत्त्वाचे.

SUV घ्यायची असेल तर काय कराल?

Picture Credit:mahindra

Mahindraची पुढील घोषणा महत्त्वाची ठरणार आहे. किती टक्के वाढ? कोणत्या SUV? आणि कधीपासून नवीन किंमत? या तीन प्रश्नांची उत्तरे कंपनीच्या अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होतील.

आता लक्ष कशाकडे?

Picture Credit:mahindra