www.navarashtra.com

Published Nov  6, 2024

By Narayan Parab

Pic Credit - Social Media

राज ठाकरेंचे हे  शिलेदार होणार का आमदार?

2019 मध्ये मनसेचे राजू पाटील हे  एकमेव उमेदवार निवडून आले होते.

एकमेव आमदार

2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 139 उमेदवार रिंगणात आहेत. 

139 उमेदवार

मनसेच्या या पाच उमेदवारांवर  विशेष लक्ष असणार आहे.  जाणून घेऊया त्यांच्याबद्दल

शिलेदार

कल्याण ग्रामीण मधून 2019 मध्ये राजू पाटील निवडून आले होते. यावेळीही ते आमदारकीचे ते प्रबळ दावेदार आहेत.

राजू पाटील

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून ते माहिम मधून उभे आहेत. त्यांना भाजपने पाठिंबा जाहीर केला आहे.

अमित ठाकरे

गजानन काळे  हे मनसेचे नवी मुंबईतील चेहरा आहेत.  बेलापूर मतदारसंघात विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्याविरुद्ध त्यांची लढत आहे.

गजानन काळे

मनसेचे आक्रमक नेते अविनाश जाधव हे ठाण्यातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणूकीत त्यांनी भाजपच्या संजय केळकर यांना चांगली टक्कर दिली होती.  

अविनाश जाधव

.

मनसेचे प्रमुख नेते बाळा नांदगावकर हे शिवडीतून निवडणूक लढवत आहेत. 2009 मध्ये ते या मतदारसंघातून निवडून आले होते. यावेळी त्यांना महायुतीनेही पाठिंबा दिला आहे.

बाळा नांदगावकर

.

राज्यात मतदारांची संख्या किती? पाहा एका क्लिकवर