Published Jan 17, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
केस आणि त्वचा टवटवीत राहावा असं प्रत्येकालाच वाटतं.
पार्लरमध्ये केसांसाठी आणि त्वचेसाठी महागड्या ट्रीटमेंट केल्या जातात.
मात्र जर आहारात या ड्रायफ्रुट्सचा समावेश केला तर त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
काळे मनुके खाल्ल्याने रक्तातील लोह वाढण्यास मदत होते.
काळ्या मनुक्याच्या सेवनाने रक्तदोष दूर होतो. त्वचेवर चकाकी येते.
त्वचेच्या आरोग्यासाठी बदाम अत्यंत फायदेशीर आहे.
रोज सकाळी बदाम खाणं कोरड्या त्वचेच्या समस्येवर रामबाण उपाय आहे.
सुकलेल्या अंजीरमध्ये पोटॅशिअमची मात्रा भरपूर असते.
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी देखील तुम्ही याचं सेवन करु शकता.
पांढऱ्या तीळाच्या सेवनाने शरीराला व्हिटामीन इ ची मात्रा मुबलक प्रमाणात मिळते.
बदाम, पांढरे तीळ, काळे मनुके आणि सुकं अंजीर रात्रभर भिजवत ठेवा. त्यानंतर सकाळी दुधातून प्या.
असं केल्याने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.