आज म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी जागतिक पुरुष दिन साजरा केला जातो.
Picture Credit: Pinterest
कुठल्याही कुटुंबात पुरुष हे आधारस्तंभ असतात.
मात्र, आपण नेहमीच पाहतो की पुरुष त्यांच्या मनातील दुःख कोणाला सांगत नाही.
समाजात मुलांना “रडायचं नाही”, “मजबूत राहायचं” अशी शिकवण दिली जाते. त्यामुळे ते भावना व्यक्त करणं टाळतात.
ही अपेक्षा पुरुषांनी कोणताही त्रास न दाखवता सर्व हाताळावं, अशी समाजाची अपेक्षा असते.
दुःख व्यक्त केल्यावर लोक पुरुषांना ‘कमकुवत’ समजतात, या भीतीने पुरुष मन मोकळं करत नाहीत.
पुरुष मानसिक आरोग्याबद्दल बोलायलाही संकोचतात, कारण त्यांना वाटतं की हे बोलणं कमकुवतीचं लक्षण आहे.