Published Dev 18, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
दक्षिण आफ्रिकाच्या क्रोकवर्ल्ड कन्व्हर्जेशन सेंटरमधील जगभरातील सर्वात वयस्कर मगरीचा 124 वा वाढदिवस साजरा करण्यात आला
1903 मध्ये बोत्सावनाच्या ओकवांगो डेल्टामधून पकडेलेला हा नर मगर हेनरी नरभक्षी आहे
ओकवांगो डेल्टाच्या आसपास याचा जन्म झाल्याचे रेस्क्यु ऑफिसरने सांगितले होते
700 किलो वजनाचा 16.4 फूट लांबसडक अशी ही नर मगर 10000 मगरींचा पिता असून 6 पेक्षा अधिक मगरींशी त्यांचा संबंध आलाय
वैज्ञानिकांनी त्याच्या वयाबाबत सांगताना हेनरीचे रक्त अत्यंत युनिक असल्याचे सांगितले, तो कधीही लवकर आजारी पडला नाही
अलबामा कॉलेजच्या स्टीव्हन ऑस्टॅडने लाईव्ह सायन्समध्ये याबाबत माहिती दिली आहे आणि मगरीचे वैशिष्ट्य सांगितले
.
ऑस्टेडने सांगितले की, रेपटाईलचे मेटाबॉलिजम अत्यंत हळू असून यांचे आयुष्य दीर्घायु आहे
.