Yamaha ची Sports Bike लवकरच होणार लाँच; जाणून घ्या काय आहे खास

Automobile

13 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

Yamaha ची YZF-R2 स्पोर्ट्स बाईक येत्या २७ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता आहे.

YZF-R2 स्पोर्ट्स बाईक

Picture Credit : bikedekho.com

ही स्पोर्ट्स बाईक KTM RC200 ला टक्कर देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणाशी होणार टक्कर

या बाईकमध्ये अंदाजे २००CC सिंगल सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन असेल.

इंजिन

हे इंजिन R15 पेक्षा लक्षणीयरित्या जास्त पॉवर आणि टॉर्क निर्माण करेल. हे इंजिन सुमारे २५ बीएचपी पॉवर देऊ शकते.

२५ बीएचपी पॉवर 

या नवीन बाईकममध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह टीएफटी इन्स्टरुमेंट कन्सोल, विविध रायडिंग मोड्स आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये असण्याची शक्यता आहे.

खास वैशिष्ट्ये

गिअर बदलण्याची बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर आणि सुरक्षेसाठी ट्ररॅक्शन कंट्रोलसह ड्युअल-चॅनल एबीएस असण्याचीही अपेक्षा आहे.

जबरदस्त फिचर्स

ही बाईक बाजारात KTM RC 200 आणि हीरो करिझ्मा XMR210 यांच्याशी स्पर्धा करेल.

कोणाशी होईल स्पर्धा?

या बाईकची एक्स-शोरुमची किंमत २ ते २.३ लाख दरम्यान असू शकते.

किंमत किती असेल?

ही नवीन बाईक आल्यानंतरही जुन्या R15 ची विक्री तशीच राहील.

विक्री कायम