Published Dec 17, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
भारतात चहाची वेगळीच क्रेझ आहे.
भारतीयांच्या दिवसाची सुरुवात चहाने होती.
एक कप चहासाठी तुम्ही किती पैसे देऊ शकता?
भारतात, चहाची किंमत 10 रुपये, 20 रुपयांपासून अगदी 500-600 रुपयांपर्यंत आहे.
पण एक असा कॅफे आहे, जिथे चहाची किंंमत तब्बल 1 लाख रुपये आहे.
या चहाची क्रेझ सातत्याने वाढत असून सोशल मीडियावरही याची चर्चा होत आहे.
बोहो कॅफे असे या कॅफेचे नाव आहे. त्याची मालकीण सुचेता शर्मा आहे. हा कॅफे दुबईत आहे.
बोहो कॅफेमध्ये एक कप चहाची किंमत AED 5000 म्हणजेच अंदाजे 1.14 लाख रुपये आहे.
चहा 24 कॅरेट सोन्याच्या पानांसह शुद्ध चांदीच्या कपमध्ये दिला जातो.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहक हा कप स्वतःजवळ ठेवू शकतात.
मेनूमध्ये गोल्ड स्मारिका कॉफी, गोल्ड-डस्टेड क्रोइसंट्स, गोल्ड ड्रिंक्स आणि अगदी गोल्ड आइस्क्रीमचा समावेश आहे.
चहा 24 कॅरेट सोन्याच्या पानांसह शुद्ध चांदीच्या कपमध्ये दिला जातो.