Published July 26, 2024
By Nupur Bhagat
बेसन हा अनादी काळापासून त्वचेच्या काळजीसाठी वापरण्यात येणारा महत्त्वाचा पदार्थ आहे
बेसनमध्ये फायबर, प्रोटीन, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जिंक असल्याने त्वचेला अधिक पोषक तत्व मिळतात
.
बेसनाचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्वचेची काळजी घेण्यासाठी वापर करू शकता, जाणून घ्या
मान काळी असल्यास लिंबाच्या रसात बेसन मिक्स करून 15-20 मिनिट्स लावा
बेसनासह दही मिक्स करून याचा लेप मानेवर लावल्यास काळी मान लवकर चमकदार होण्यास मदत मिळते
मानेवरील काळेपणा कमी करण्यासाठी बेसन आणि गुलाबपाण्याचा वापर करावा
बेसन आणि कोरफड जेल मिक्स करून याची पेस्ट काळ्या झालेल्या मानेवर लावा आणि परिणाम पाहा
बेसनामुळे डेड स्किन निघतात, त्वचा अधिक चमकदार होण्यास मदत मिळते आणि त्वचेला मऊपणा मिळतो
सौंदर्यासाठी चेहऱ्यावर कोणतेही पदार्थ वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्यावी