मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन स्मार्ट प्लॅन आणला आहे.
Img Source: Pinterest
नवीन स्मार्ट मेंटेनन्स प्लॅन (SMP) सुरु केला असून हा एक प्रीपेड प्लॅन आहे.
या योजनेचा उद्देश वाहन मालकांना सेवा आणि देखभालीच्या खर्चाचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यास सक्षम करणे, तसे बचत करणे.
या योजनेमुळे ग्राहकांना भविष्यात वाढणाऱ्या सेवा खर्चाची चिंताही कमी होईल.
ग्राहक नवीन वाहन खरेदी करताना या योजनेचा लाभ घेऊ शकतात किंवा नंतर कोणत्याही अधिकृत मारुती सुझुकी वर्कशॉपमधून ती खरेदी करु शकतात.
यामध्ये केवळ मजुरीचा खर्च समाविष्ट असलेल्या योजना, सुटे भाग आणि मजुरी दोन्ही समाविष्ट असलेले पॅकेजेस, तसेच व्यावसायिक वाहनांसाठी किरकोळ सेवा पॅकेजेसचा समावेश.
कंपनी निवडक भागांसाठी, ज्यामध्ये क्लच आणि ब्रेकशी संबंधित भागांचा समावेश आहे, ऐच्छिक झीज विमा संरक्षण देखील देत आहे.
ही योजना निवडणाऱ्या ग्राहकांची मजुरी शुल्कावर किमान १०० टक्के बचत होईल, तसेच त्यांना सुटे भाग आणि उपभोग्य वस्तूंवरही अतिरिक्त बचतीचा लाभ मिळेल.
मारुती सुझुकीने वेगवेगळ्या कालावधी आणि किलोमीटर क्षमतेसह या एसएमपी योजना सादर केल्या आहेत, ज्या ग्राहक त्यांच्या गरजेनुसार निवडू शकतात.
खाजगी कार मालक २ वर्षे किंवा २०,००० पासून ते १० वर्षे किंवा १ लाख किमी पर्यंतचे संरक्षण निवडू शकतात.
व्यावसायिक वाहन मालकांसाठी हे संरक्षण १० वर्षे किंवा १,६०,००० किलोमीटरसाठी उपलब्ध आहे.
ही योजना संपूर्ण भारतात लागू आहे.