Hyundaiची कार घेण्याचा विचार करत असाल तर आताच घ्या. १ जूनपासून वाढणार किंमती.
Img Source: Pinterest
जून २०२६ च्या दर सुधारणेनुसार Hyundai गाड्या १२,८०० पर्यंत महाग होतील आणि मॉडेल्सच्या किमती वेगवेगळ्या असतील.
तुम्ही १ जूनच्या आधी कार खरेदी केली तर तुम्हाला त्यासाठी सध्याची एक्स शोरुम किंमत मोजावी लागेल.
कंपनीने प्रत्येक मॉडेलसाठी नेमकी दरवाढ किती असेल हे स्पष्ट केलेले नाही. मात्र, कमाल वाढ १२,८०० असेल.
भाववाढीचे कारण म्हणजे वाढणारा उत्पादन खर्च. कच्च्या मालाची किंमत वाढत आहे.
पोलाद, aluminum, तांबे आणि प्लास्टिक यांसारख्या औद्योगित सामग्रीचा वापर उत्पादनामध्ये केला जातो. त्यांच्या किंमतीत फरकाचा उत्पादन करणाऱ्या कंपनीवर परिणाम होतो.
कंपन्या अनेकदा वाढत्या कच्च्या मालाच्या किंमतीचा काही भार स्वत: उचलतात. परंतु, दीर्घकालीन महागाईमुळे उत्पादनांच्या किंमत वाढतात.
होंडाई व्यतिरिक्त मारुती सुझुकीसह भारतीय बाजारातील इतर कंपन्यांनीही त्यांच्या गाड्यांच्या दरात वाढ जाहीर केली.
मारुती सुझुकीची वाहने ३०,००० रुपयांपर्यंत महाग होणार आहेत.