भारताचा रमेशबाबू प्रज्ञानंद या सध्या चेस रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर आहे. सुरू असलेल्या चांगल्या कामगिरीने त्याने चार स्थान उडी मारली आहे.
Picture Credit: Instagram/X
अर्जुन एरिगैसी या जागतिक क्रमवारीमध्ये रमेशबाबू प्रज्ञानंदच्या खाली म्हणजेच पाचव्या स्थानावर आहे.
वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश सध्या चेस रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर आहे, त्याची रेटिंग २८८७ इतकी आहे.
वर्ल्ड रँकिंगमध्ये तेराव्या स्थानावर पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद हे आहेत.
अरविंद चिदंबरम हा वर्ल्ड रँकिंगमध्ये २४ व्या स्थानावर आहे, त्याची रेटिंग २७२४ इतकी आहे.
विधीत गुजराती वर्ल्ड रँकिंगमध्ये तो सध्या २६ व्या स्थानावर आहे. त्याची रेटिंग २७२० इतकी आहे.
पेंटला हरिकृष्ण हा जागतिक क्रमवारीमध्ये ३० व्या स्थानावर आहे, त्याची रेटिंग २७०९ इतकी आहे.
निहाल सरीन या जागतिक क्रमवारीमध्ये ३७ व्या क्रमवारीमध्ये आहे. त्याने ९ स्थान उडी मारली आहे.
साधवानी रौनक याने जागतिक क्रमवारीमध्ये ४५ वे स्थान गाठले आहे.
जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा कार्तिकेय मुरली हा ७६ व्या स्थानी आहे त्याची रेटिंग २६५९ इतकी आहे.
टॉप १०० मध्ये जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा पुराणिक अभिमन्यू ९४ व्या स्थानावर आहे.
टॉप १०० मध्ये ९६ व्या स्थानावर आर्यन चोप्रा आहे. भारताचे १२ चेस खेळाडू टॉप १०० मध्ये आहेत.