महिलांमध्ये सामान्य झालेत 4 कॅन्सर

Written By: Dipali Naphade 

Source: iStock

सध्या महिलांमध्ये चार प्रकारचे कॅन्सर अधिक वाढताना दिसून येत आहेत. कोणते आहेत हे कॅन्सर?

कॅन्सर

डॉ. अदिती चतुर्वेदी, सल्लागार, ऑन्कोलॉजी, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साकेत यांनी याबाबत अधिक माहिती दिली

तज्ज्ञ

स्तनांचा कर्करोग हा आजार महिलांमध्ये अत्यंत कॉमन झालाय. निप्पलमधून रक्त येणं, पाणी येणं ही याची लक्षणे आहेत

ब्रेस्ट कॅन्सर

नियमितपणे महिलांनी मॅमोग्राफी तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, तरच कॅन्सरविषयी वेळीच कळेल

तपासणी

मासिक पाळीत बदल, मेनोपॉजनंतर ब्लिडिंग, दुर्गंधीयुक्त डिस्चार्ज लक्षणे असतील तर वेळीच सर्वायकल कॅन्सरची तपासणी करावी

सर्वायकल कॅन्सर

ओवेरियन कॅन्सरमध्ये ओव्हरीदरम्यान सिस्ट तयार होतात, ज्यामुळे पोटदुखी, सूज आणि सतत लघवीला होते. हा कॅन्सर गरोदरपणासाठी घातक ठरतो

ओवेरियन कॅन्सर

युट्रस कॅन्सर असल्यास एंडोमेट्रियमच्या नसा असमान्यरित्या वाढतात. यामुळे हार्मोनल बदल, अनियमित पाळी आणि पोटाच्या खालच्या भागात त्रास होतो

युट्रस कॅन्सर

कॅन्सर हा अनुवंशिक असू शकतो. त्यामुळे महिलांनी वयाच्या ३० नंतर नियमितपणे तपासणी करत रहावी

कारण

डाएटमध्ये पोषक तत्वांचा समावेश करावा. प्रोसेस्ड, जंक फूड टाळावे. बिया, हिरव्या भाज्या, ड्रायफ्रूट्स खावेत

हेल्दी डाएट