जेवणाला द्या शाही तडका, घरी बनवा हैदराबादी पुलाव

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

हैदराबादी बिर्याणी तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल मात्र तुम्ही कधी हैदराबादी पुलाव खाल्ला आहे का?

हैदराबादी पुलाव

शाही चवीचा हा पुलाव घरी तयार करणे फार सोपे आहे

चव

पाण्यात मीठ व थोडे मसाले लवंग, वेलदोडे टाकून उकळा व तांदूळ 80% शिजवून घ्या

तांदूळ अर्धवट शिजवा

एका वाडग्यात तळलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, फ्लॉवर, पनीर, बटाटा, वाटाणे आणि  आलं लसूण पेस्ट घाला

भाज्या

याच वाडग्यात दही, मीठ, बिर्याणी मसाला, गरम मसाला, हळद, मसाला आणि चिरलेली कोथिंबीर घालून सर्वकाही अर्धा तास मॅरीनेट होऊ द्या

मसाले

आता एका कढईत तेल टाकून मॅरीनेट केलेले साहित्य टाका आणि भाज्या मऊ होईपर्यंत शिजवून घ्या

कढई

भाज्या शिजल्या की मग त्यात तयार भात वरून चिरलेला पुदिना, कोथिंबीर आणि तळलेल्या कांद्याचा थर लावा

भात

हवे असल्यास तुम्ही यात केशरयुक्त दूध वरून शिंपडू शकता

केशर 

झाकण लावून १५-२० मिनिटे मंद आचेवर बिर्याणीला 'दम' द्या आणि गॅस बंद करा

दम

काही वेळाने बिर्याणी प्लेटमध्ये काढा आणि रायत्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

सर्व्ह करा