शिळी चपाती फेकून न देता तुम्ही त्यापासून चवदार पदार्थ तयार करू शकता.
Picture Credit: Pinterest
शिल्लक पोळ्या भाजून त्याची बारीक पूड करून गूळ आणि तुपासोबत एकजीव करा. वेलची आणि सुकामेवा घालून लाडू वळून घ्या.
Picture Credit: Pinterest
पोळीचे छोटे तुकडे करून फोडणीत परतल्यास कुरकुरीत चिवडा तयार होतो. चहासोबत खायला हा हलका आणि झटपट स्नॅक उत्तम लागतो.
Picture Credit: Pinterest
पोळीवर सॉस, भाज्या आणि चीज घालून तव्यावर झाकण ठेवून शिजवा. काही मिनिटांत मुलांना आवडणारा इंस्टंट पिझ्झा तयार होतो.
Picture Credit: Pinterest
गरम पोळीमध्ये भाजी, चटणी आणि कांदा घालून घट्ट रोल करा. डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा पौष्टिक पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest
दुधात पोळीचे तुकडे शिजवून साखर आणि वेलची घातल्यास चविष्ट खीर बनते.
Picture Credit: Pinterest