Published Jan 18, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
इंटरनॅशनल जर्नल ऑफ जेएनसीआय कॅन्सर स्पेक्ट्रमच्या अभ्यासानुसार, अयोग्य डाएटमुळे कॅन्सरचा धोका वाढतोय
कॅन्सर रोखण्यासाठी डाएटमध्ये गाजर, ब्रोकोली, टॉमेटो आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करून घ्यावा
रोज जांभूळ, संत्रे, द्राक्ष आणि लिंबू यासारख्या फळांचे सेवन करावे, ज्यातील अँटीऑक्सिडंट्स कॅन्सरचा धोका कमी करतात
ब्राऊन राईस, ओट्स आणि होल व्हीट ब्रेड डाएटमध्ये सामावून घ्यावे, जेणेकरून कॅन्सर आसपास फिरकत नाही
दूध, दही, पनीर अशा डेअर उत्पादनांचा खाण्यात वापर करावा. यातील कॅल्शियम, विटामिन डी कोलोरेक्टल कॅन्सर दूर ठेवतात
आपल्या आहारात प्रोसेस्ड रेट मीटचे सेवन अत्यंत कमी करावे. याचे अधिक सेवन केल्याने कॅन्सरचा धोका वाढतो
धुम्रपान, दारू, वजनवाढ यामुळे कॅन्सर 70% होण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवावे
पौष्टिक आहार आणि हेल्दी लाईफस्टाईल अंगिकारून कॅन्सरची जोखीम तुम्ही कमी करून इम्युनिटी वाढवा
भाजी आणि फळांमधील फायटोन्यूट्रिएंट्स, विटामिन आणि मिनरल्स शरीर चांगले राखते आणि कॅन्सरचा प्रभाव कमी करते
आपल्या आहारात अधिकाधिक नैसर्गिक पदार्थांचा आणि पौष्टिक तत्वांचा समावेश केल्यास कॅन्सरचा धोका कमी होईल
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही