Published Nov 11, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
डायबिटीस नियंत्रणासाठी खा 5 भिजवलेले पदार्थ
बिघडलेल्या लाइफस्टाइल आणि खाण्याच्या सवयीमुळे डायबिटीसची समस्या ही कॉमन झालेली दिसून येत आहे. कसे आणावे नियंत्रणात?
डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी औषधं घेतली जातात. पण औषधांशिवाय तुम्ही काही पदार्थांचाही वापर करू शकता
डायबिटीस नियंत्रणासाठी तुम्ही बदाम, अक्रोडसारखे ड्रायफ्रूट्स नियमित भिजवून खावे. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीमध्ये यामुळे सुधारणा होते
.
कडुलिंबाच्या पानात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुण असून रात्री 10-12 पानं भिजवून सकाळी उपाशीपोटी चावून खाल्ल्यास डायबिटीस संतुलित राहतो
.
आवळ्यातील विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स डायबिटीस नियंत्रणात आणते. रात्री 2-3 आवळ्याचे तुकडे पाण्यात भिजवा सकाळी खा
बडिशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असून साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी उपयोग होतो. रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी खा
फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असलेले मेथी दाणे रक्तातील साखर लवकर नियंत्रित करते. रात्री पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपोटी सेवन करावे
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणाताही दावा करत नाही