भारतात वाहन खरेदीचा विक्रम!

Automobile

25 May, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

भारतीय वाहन बाजारपेठेने नवीन उंची गाठली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात देशात एकूण २८.३ दशलक्षाहून अधिक वाहनांची विक्री झाली.

२.८३ कोटी वाहनांची विक्री

Img Source: Pinterest 

देशात दर मिनिटाला अंदाजे ५४ वाहने खरेदी केली जातात. ही आकडेवारी भारताचे वाहन क्षेत्र किती वेगाने वाढत आहे हे दर्शवते.

प्रत्येक मिनिटाला ५४ वाहने विकली

या विक्री डेटामध्ये भारतात विकल्या गेलेल्या दुचाकी, कार आणि व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. हा डेटा SIAM ने शेअर केला.

SIAM ने शेअर केला डेटा

विक्रमी विक्री

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सच्या आकजेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये देशभरात वाहन विक्रीने विक्रमी पातळी गाठली आहे. 

विक्रीत १०.४% वाढ

मागील वर्षाच्या तुलनेत १०.४ टक्क्यांनी वाढून २,८२,६५,५१९ युनिट्सवर पोहोचली. ज्यामध्ये दुचाकींचा वाटा सर्वाधिक होता.

सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणारा पडदा

आर्थिक वर्ष २०२६ मध्ये देशात २१.७ दशलक्षाहून अधिक दुचाकींची, तर ४.६४३ दशलक्ष प्रवासी वाहनांची विक्री झाली. व्यावसायिक आणि तीनचाकी विभागांमध्येही वाढ दिसून येत आहे.

महाराष्ट्र अव्वल

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सर्वात मोठ्या वाहन बाजारपेठा म्हणून उदयास आल्या. प्रवासी वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र तर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेश आघाडीवर आहे.

या राज्यांचाही समावेश

गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक यांचाही अव्वल राज्यांमध्ये समावेश होता. वाहन उद्योगाच्या या वेगवान वाढीमागे अनेक कारणे असल्याचे मानले जाते. 

या कारणांमुळे विक्री वाढली

जीएसटी २.० व्याजदरातील कपाक आणि ग्रामीण भागातील वाढलेल्या मागणीमुळे विक्रीला चालना मिळाली आहे. ईव्ही, सीएनजी आणि हायब्रीड वाहनांच्या वाढत्या लोकप्रियतेनेही बाजाराला गती दिली आहे.