Published Oct 10, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
माशाच्या तेलाचे आरोग्यासाठी 7 कमालीचे फायदे
माशाच्या तेलात ओमेगा फॅटी 3 अॅसिड जास्त प्रमाणात आढळत असून आरोग्यासाठी अगदी रामबाण ठरते
माशाच्या तेलाचे अनेक फायदे असून 7 असे फायदे आहेत जे तुम्हाला माहीत असायलाच हवेत
फिश ऑईल हृदयाचे ठोके सुरळीत करून रक्तप्रवाह चांगले बनवते, तसंच यातील पोषक तत्व हृदय निरोगी राखतात
.
मेंदूचे कार्य अधिक चांगले करण्यासाठी फिश ऑईल अधिक फायदेशीर ठरते. यामुळे स्मरणशक्ती वाढते, तणाव कमी होतो
.
वाढत्या वयासह दृष्टी कमी व्हायला नको असेल तर तुम्ही फिश ऑईलचा उपयोग करून घेऊ शकता
फिश ऑईल त्वचेला आतून मुलायमपणा देते आणि यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढते आणि फंगल इन्फेक्शन कमी होते
फिश ऑईलमधील पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट वजन नियंत्रित करण्यास मदत करते. तुम्ही सप्लिमेंट्स खाऊ शकता
शरीरावर आलेली सूज कमी करण्यासाठीही, सांधेदुखीरपासून आराम देण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर होतो
फिश ऑईलमुळे शरीराचा त्रास दूर होतो, आळस येत नाही आणि झोपही चांगली लागते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही