www.navarashtra.com

Published  Jan 0३,  2025

By  Dipali Naphade

महिलांच्या 7 समस्या होतील दूर, आळशीच्या बी चा करा वापर

Pic Credit- iStock

आळशीत अनेक पोषक तत्व असून लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फोरसचे प्रमाण अधिक आहे

आळशी

डाएट अँड न्यूट्रिशन क्लिनिक द्वारका डाएटिशियन डॉक्टर सुगीता मुटरेजाने सांगितले की, महिलांना आळशी खाल्ल्याने फायदा होतो

तज्ज्ञ

महिलांच्या अनेक आरोग्य समस्या आळशीचे नियमित सेवन केल्याने दूर होऊ शकतात असंही डॉक्टर म्हणाले

महिलांसाठी उत्तम

मासिक पाळी अनियमित असेल तर नैसर्गिक उपाय म्हणून नियमित आळशी खावी

अनियमित पाळी

महिलांची फर्टिलिटी वाढण्यास आळशीच्या बियांमुळे मदत मिळते, याशिवाय गर्भधारणेची प्रक्रिया सोपी होते

फर्टिलिटी

ज्या महिलांना हार्मोन असंतुलनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी आळशी फायदेशीर असून एस्ट्रोजन हार्मोनचा स्तर नियंत्रित करते

हार्मोनल असंतुलन

आळशीच्या बियांमुळे पचनक्रिया अधिक सुरळीत होते कारण यात उच्च प्रमाणात फायबर असून गॅस, बद्धकोष्ठता दूर करते

पचन

.

आळशीतील अँटीऑक्सिडंट्स आणि एसेन्शियल ऑईल त्वचा अधिक चमकदार करण्यास मदत करते

त्वचा

.

याशिवाय आळशीचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रित राहते आणि डोळे, हृदयाचे आरोग्यही चांगले राहते

वजन

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.