उन्हाळ्यात दिवसभरात किमान 8–10 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. नियमित पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहते.
Picture Credit: Pinterest
नारळ पाणी शरीराला नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स देते. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
Picture Credit: Pinterest
कलिंगड, खरबूज, काकडी यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खाल्ल्याने शरीराला हायड्रेशन मिळते.
Picture Credit: Pinterest
दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणे शक्यतो टाळा. या वेळेत उष्णता जास्त असल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
कापसाचे आणि सैल कपडे घातल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि घाम कमी येतो.
Picture Credit: Pinterest
कॉफी, चहा आणि सॉफ्ट ड्रिंक्स जास्त पिल्याने शरीरातील पाणी कमी होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
लिंबूपाणी, कोकम सरबत किंवा शरबत यांसारखे पेय पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि डिहायड्रेशन टाळता येते.
Picture Credit: Pinterest