घरच्या घरी बनवा गोड,  मऊ मिष्टी दोई

Life style

09 March 2026

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम एका पातेल्यात दूध घेऊन मध्यम आचेवर उकळून घ्या आणि थोडे घट्ट होईपर्यंत 8–10 मिनिटे उकळू द्या.

दूध उकळा

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या पॅनमध्ये साखर मंद आचेवर वितळू द्या. साखर सोनेरी रंगाची कॅरॅमल होईपर्यंत हलवत राहा.

 कॅरॅमल तयार करा

Picture Credit: Pinterest

तयार कॅरॅमल सावधपणे उकळलेल्या दुधात घाला आणि चांगले ढवळून घ्या, त्यामुळे दुधाला हलका ब्राउन रंग येईल.

दूधात कॅरॅमल मिसळा

Picture Credit: Pinterest

दूध पूर्ण थंड न होता कोमट होईपर्यंत ठेवून द्या.

दूध कोमट होऊ द्या

Picture Credit: Pinterest

कोमट दुधात 2 टेबलस्पून दही घालून नीट मिसळा.

 दही घाला

Picture Credit: Pinterest

हे मिश्रण मातीच्या भांड्यात किंवा बाऊलमध्ये घालून 6–8 तास झाकून उबदार जागी ठेवा.

 सेट होण्यासाठी ठेवा

Picture Credit: Pinterest

दही सेट झाल्यावर ते फ्रिजमध्ये थंड करा आणि थंडगार, क्रीमी मिस्टी दोई सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest