Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असते, जे सुरकुत्या, मुरुम कमी करून त्वचेला तेजस्वी बनवते.
यामध्ये पपेन नावाचे एंझाईम असते, जे अन्नातील प्रथिने सहज पचवण्यासाठी मदत करते.
पपईमध्ये भरपूर व्हिटॅमिन C असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असून ते हृदयविकाराचा धोका कमी करतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन A पपईमध्ये मुबलक प्रमाणात असते.
पपईतील अँटी-इंफ्लेमेटरी घटक शरीरातील सूज व वेदना कमी करण्यास मदत करतात.
पपईमधील एंझाईम्स व पोषकद्रव्ये जखमा लवकर भरून येण्यासाठी उपयोगी पडतात.
पपईमध्ये कमी कॅलोरी आणि जास्त फायबर असल्याने भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यात मदत होते.