घरी बनवा राजस्थानी स्टाईल लसणाची चटणी

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

जेवणासोबत तोंडी लावायला लसणाची चटणी एक चवदार पर्याय आहे

लसणाची चटणी

सुक्या लाल मिरच्यांना गरम पाण्यात १०-१५ मिनिटं भिजवून ठेवा, त्यामुळे त्या मऊ होतात आणि वाटायला सोप्या होतात.

मिरच्या भिजवा

लसणाच्या पाकळ्या सोलून तयार ठेवा. मोठ्या पाकळ्या असल्यास थोड्या चिरून घ्या.

लसूण सोलून ठेवा

जिरे थोडं कोरडं भाजून घ्या, त्यामुळे त्यांचा स्वाद वाढतो.

जिरे भाजा

आता भिजवलेल्या मिरच्या, लसूण, भाजलेले जिरे, मीठ आणि थोडंसं पाणी मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या.

मिक्सरमध्ये वाटा

एका पातेल्यात तेल गरम करा आणि त्यात ही वाटलेली चटणी घालून २-३ मिनिटं परतून घ्या. त्यामुळे कच्चेपणा जातो.

तेल गरम करा

गॅस बंद केल्यावर थोडा लिंबाचा रस घालून एकत्र करा, ही स्टेप ऑप्शनल आहे.

लिंबाचा रस घाला

चटणी थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. ही चटणी ७-८ दिवस टिकते.

थंड करून साठवा