Published Oct 14, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
9 पद्धतीचे रायता बनवा, जेवण होईल स्वादिष्ट आणि पौष्टिक
उन्हाळ्यात काकडीचे रायते अत्यंत उत्तम ठरते. काकडी किसून त्यात दही मिक्स करून याचे रायते खावे
चटपटीत आणि चविष्ट बुंदी रायत्याने तुम्ही तुमच्या जिभेचे स्वादिष्टपणाचे चोचले नक्कीच पुरवू शकता
कांद्याची कोशिंबीर जेवणाचा स्वाद अधिक वाढवते. कांदा, दही, लाल तिखट, मीठ आणि त्यावर फोडणी घालून हे खावे
.
टॉमेटोचे बारीक तुकडे करून त्यात शेंगदाणा कूट, हिरवी मिरची, ओलं खोबरं, दही आणि वरून फोडणी करून रायते बनवावे
.
हेल्दी खायचे असेल दही आणि उकडलेले पालक फेटून घ्या आणि त्याचे रायते बनवा
उत्तम चवीचे गाजर रायता बनवणे सोपे आहे. गाजर किसून त्यात दही, मीठ आणि वरून फोडणी द्या
स्वाद आणि आरोग्यासाठी डाळिंब, अननस, सफरचंद, द्राक्ष, केळं बारीक कापून त्यात दही आणि साखर मिक्स करून रायता बनवा
दुधी उकडवून घ्या, त्यात दही घालून मिक्स करा आणि वरून फोडणी द्या. हे अत्यंत चविष्ट असून आरोग्यासाठी फायदेशीर ठरते
तोंडलीत ओलं खोबरं, हिरवी मिरची टाकून उकडवून घ्या. नंतर मॅश करून वरून फोडणी द्या आणि दही मिक्स करा