Published August 24, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Social Media
'या' महिला चित्रपट निर्मात्यांचे 'हे' खास चित्रपट नक्की पहा.
'या' बॉलीवूडमधील प्रसिद्ध महिला चित्रपट दिग्दर्शिका आहेत ज्याने त्यांच्या कारकिर्दीत अनेक धमाकेदार चित्रपट केले आहेत.
जोया अख्तरने २००९ मध्ये 'लक बाय चान्स' या चित्रपटातून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. आणि २०११ मध्ये त्यांचा 'जिंदगी न मिलेगी दुबारा' हा चित्रपट प्रसिद्ध झाला.
.
फराहने तिच्या कारकिर्दीची सुरुवात 'में हू ना' या चित्रपटापासून केली. यानंतर निर्माता 'ओम शांती ओम' या चित्रपटासाठी प्रसिद्ध झाली.
गौरी शिंदेने 'इंग्लिश विंग्लिश' आणि 'डिअर जिंदगी' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हे दोन्ही चित्रपट लोकांच्या पसंतीस आले आहे.
मीरा नायर या एक भारतीय आणि अमेरिकन फिल्म डायरेक्टर आहेत, त्यांनी 'द नेमकेस' आणि 'मानसून वेडिंग' असे चित्रपट केले आहेत.
किरण रावचा पहिला चित्रपट 'धोबी घाट' होता. यानंतर त्यांनी 'लापता लेडीस' या चित्रपटाची निर्मिती केली, हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला.
मेघना गुलजार यांनी 'राजी' आणि 'छपाक' यांसारखे चित्रपट केले असून, त्यांनी 'सैम बहादूर' या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे.
सोनाली बोस यांनी 'द स्काय इज पिंक' आणि 'मार्गारीटा विथ ए स्ट्रॉ' यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.