सर्वप्रथम पनीरचे लांबट तुकडे करून घ्या. एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट परता.
Picture Credit: Pinterest
आता त्यात कांदा, ढोबळी मिरची आणि टोमॅटो घालून २ ते ३ मिनिटे परता. भाज्या थोड्या कुरकुरीत राहतील याची काळजी घ्या.
Picture Credit: Pinterest
यानंतर त्यात लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ घाला. सर्व मसाले व्यवस्थित मिसळा.
Picture Credit: Pinterest
आता पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने परता. पनीर मसाल्यासोबत छान कोट झालं की गॅस बंद करा.
Picture Credit: Pinterest
तव्यावर चपाती हलकी गरम करून घ्या. त्यावर टोमॅटो सॉस आणि मेयोनीज पसरवा.
Picture Credit: Pinterest
चपातीच्या मधोमध तयार पनीरचं मिश्रण ठेवा. इच्छेनुसार वरून कांद्याचे काप किंवा चीज घालू शकता.
Picture Credit: Pinterest
आता चपातीचा घट्ट रोल करून बटर लावलेल्या तव्यावर हलकी भाजून घ्या. गरमागरम पनीर फ्रँकी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest