गरमागरम आणि क्रीमी हॉट चॉकलेट; जाणून घ्या रेसिपी

Life style

8 August 2026

Author:  नुपूर भगत

एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध घ्या आणि मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवा. दूध पूर्ण उकळू देऊ नका.

दूध गरम करा

Picture Credit: Pinterest

एका छोट्या वाटीत कोको पावडर आणि कॉर्नफ्लोअरमध्ये थोडे दूध घालून गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने मिश्रण तयार करा.

कोको पावडर मिसळा

Picture Credit: Pinterest

हे कोकोचे मिश्रण गरम होत असलेल्या दुधात घाला आणि सतत ढवळत राहा.

मिश्रण दुधात घाला

Picture Credit: Pinterest

आता त्यात साखर आणि बारीक केलेले चॉकलेट घाला. चॉकलेट पूर्णपणे वितळेपर्यंत मंद आचेवर ढवळत राहा.

साखर आणि चॉकलेट घाला

Picture Credit: Pinterest

मिश्रणात चिमूटभर मीठ आणि व्हॅनिला इसेन्स घाला. यामुळे चॉकलेटची चव अधिक उठून दिसते.

चव वाढवा

Picture Credit: Pinterest

मिश्रण थोडे घट्ट आणि क्रीमी होईपर्यंत १-२ मिनिटे मंद आचेवर शिजवा. सतत ढवळत राहा.

 हॉट चॉकलेट घट्ट करा

Picture Credit: Pinterest

तयार हॉट चॉकलेट कपमध्ये ओता. वरून व्हिप्ड क्रीम किंवा चॉकलेट शेव्हिंग्स घालून गरमागरम सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest